गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चीनमध्ये या आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतली बैठक

by India Darpan
जानेवारी 5, 2025 | 12:47 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
doctor

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (DGHS – Directorate General of Health Services) अध्यक्षतेखाली आज संयुक्त देखरेख गटाची (JMG) बैठक पार पडली. जागतिक आरोग्य संघटना (WHO), आपत्ती व्यवस्थापन विभाग, एकात्मिक रोग संनिरीक्षण कार्यक्रम (Integrated Disease Surveillance Programme – IDSP), राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग आणि दिल्लीतील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रुग्णालयासह इतर रुग्णालयांमधले तज्ञ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले.

या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आणि सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे उपस्थित प्रतिनिधींमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली, हे मुद्दे खालीलप्रमाणे :
ताप सर्दी सदृश्य विषाणूजन्य संसर्ग अर्थात फ्लूचा सध्याचा हंगाम पाहता चीनमधील सध्याची परिस्थिती ही असामान्य नाही. या संदर्भातील उपलब्ध अहवालांमधूनही असेच सूचित गेले आहे की या ऋतुमध्ये सामान्यतः आढळून येणार्‍या आरएसव्ही आणि एचएमपीव्ही या रोगजन्य विषाणूंच्या संसर्गामुळेच तिथे श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे.

सरकार सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, यासोबतच चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्ययावत माहिती सामायिक करावी अशी विनंती देखील जागतिक आरोग्य संघटनेला केली गेली आहे.

सद्यस्थितीत भारतासह जगभरात वर नमूद केलेल्या विषाणूंचा या आधीच प्रसार झालेला आहे. सद्यस्थितीत भारतात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि एकात्मिक रोग संनिरीक्षण कार्यक्रम या दोन्ही संस्थांच्या विस्तारलेल्या व्यवस्थांच्या माध्यमातून इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गसदृश्य आजार (ILI) तसेच गंभीर आणि तीव्र श्वसन विकाराअंतर्गच्या आजारांच्या बाबतीत एक मजबूत देखरेख प्रणाली या आधीपासूनच अस्तित्वात आहे. यासंदर्भात दोन्ही संस्थांनी उपलब्ध केलेल्या आकडेवारीवरून देशात इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गसदृश्य आजार (ILI) तसेच गंभीर आणि तीव्र श्वसन विकाराअंतर्गच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये असामान्य वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही.

गेल्या काही आठवड्यांमध्ये ऋतुंप्रमाणे अपेक्षित असलेले बदल वगळता देशभरात श्वसनाशी संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली नसल्याची बाबही विविध रुग्णालयांमधील डॉक्टरांनी स्पष्ट केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या देशभरात विस्तारलेल्या व्यवस्थेने देखील श्वसन विषयक आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या एडेनोव्हायरस, आरएसव्ही, एचएमपीव्ही अशा विविध प्रकाराच्या विषाणुंच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्या सर्व नमुना चाचण्यांमध्ये देखील या रोगजन्य विषाणुंच्या प्रकरणांमध्ये असामान्य स्वरुपाची वाढ दिसून आली नाही. त्याचवेळी सध्याच्या परिस्थितीत खबरदारीची उपाययोजना म्हणून वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देशभरात एचएमपीव्हीची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाणार आहे, आणि या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधन परिषद येत्या वर्षभरात एचएमपीव्हीचा कल कसा राहतो, याची कठोर देखरेख करणार आहे.

देशभरात अलिकडेच पूर्वतयारीशी संबंधीत प्रात्यक्षिके झाली. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर देशात श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.

देशाची आरोग्य यंत्रणा आणि देखरेखीशी संबंधित देशभरात विस्तारलेली व्यवस्था पूर्णतः सतर्क आहेत, आणि या माध्यमातून देश अचानकपणे उद्भवणाऱ्या कोणत्याही आरोग्यविषयक आपत्ती आणि आव्हानांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असल्याची सुनिश्चिती केली जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात ठिकठिकाणी होणार इनोव्हेशन हब….

Next Post

ओंकारेश्वरमध्ये .भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प…

India Darpan

Next Post
Untitled 4

ओंकारेश्वरमध्ये .भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प…

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011