नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने एप्रिल ते जून 2022 या कालावधीतील जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातील उर्वरित नुकसानभरपाई म्हणून 24 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यांना 17,000 कोटी रुपये वितरित केले आहेत. यापैकी महाराष्ट्राला सर्वाधिक 2,081 कोटी रुपये मिळाले . (राज्य-निहाय तपशील खालील परिशिष्टात दिले आहेत). 2021-22 या आर्थिक वर्षात जीएसटी भरपाई म्हणून आतापर्यंत राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना उपरोल्लेखित रकमेसह एकूण 1,15,662 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
ऑक्टोबर 2022 पर्यंत केवळ 72,147 कोटी रुपये एकूण अधिभार संकलन झाले ही सत्य परिस्थिती आहे आणि तरीही, केंद्र सरकारतर्फे स्वतःच्या स्त्रोतांकडून 43,515 कोटी रुपये जारी करण्यात येत आहेत. यामुळे केंद्राने आगाऊ स्वरुपात या वर्षी मार्च महिन्यापर्यंत संकलित करण्यात येणारी अधिभाराची अंदाजित संपूर्ण रक्कम राज्यांना भरपाई म्हणून उपलब्ध करून दिली आहे.राज्यांना त्यांच्या स्त्रोतांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता यावे तसेच विद्यमान आर्थिक वर्षात त्यांचे कार्यक्रम, विशेषतः भांडवलावरील व्यय यशस्वीपणे करणे सुनिश्चित व्हावे या उद्देशाने असा निर्णय घेण्यात आला आहे.
फेब्रुवारी ते मार्च 2022 या काळासाठीची तात्पुरत्या स्वरूपातील जीएसटी भरपाई म्हणून केंद्र सरकारने या वर्षी मे महिन्यात देखील 86,912 कोटी रुपये वितरीत केले होते. त्या वेळी जीएसटी नुकसानभरपाई निधीमध्ये केवळ 25,000 कोटी रुपये शिल्लक असून देखील स्वतःच्या स्त्रोतांमधून 62,000 कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था करून सरकारने राज्यांना पाठबळ पुरविले होते.
राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे नाव (कोटीमध्ये रु.)
आंध्र प्रदेश ६८२
आसामी १९२
बिहार ९१
छत्तीसगड ५००
नवी दिल्ली १२००
गोवा ११९
गुजरात ८५६
हरियाणा ६२२
हिमाचल प्रदेश २२६
जम्मू आणि काश्मीर २०८
झारखंड ३३८
कर्नाटक १,९१५
केरळ ७७३
मध्य प्रदेश ७२२
महाराष्ट्र २०८१
ओडिशा ५२४
पाँडिचेरी ७३
पंजाब ९८४
राजस्थान ८०६
तामिळनाडू १,१८८
तेलंगणा ५४२
उत्तर प्रदेश १,२०२
उत्तराखंड ३४२
पश्चिम बंगाल ८१४
एकूण १७०००
Union Government GST Refund State Governments