नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तीन विमानतळांबाबत मोठी घोषणा केली आहे. नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि शिरडी या तीन विमानतळांना ग्रीन फील्ड विमानळ म्हणून उभारणी करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. येत्या काळात या तिन्ही विमानतळांवरुन प्रवासी विमानसेवेला मोठा वेग येण्याची अपेक्षा सरकारला आहे.
महाराष्ट्रातील नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि शिर्डी, गोव्यात मोपा,कर्नाटकातील विजापूर, हसन, कलबुर्गी आणि शिमोगा, मध्य प्रदेशातील डबरा (ग्वाल्हेर) उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि जेवार (नोएडा), गुजरातमधील ढोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरीतील कराईकल, आंध्र प्रदेशातील दगदार्थी, भोगापुरम आणि ओरवाकल (कुर्नूल), पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पाकयोंग, केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेशातील होलोंगी (कुर्नूल). इटानगर) या देशातील २१ ग्रीनफिल्ड विमानतळांच्या उभारणीसाठी भारत सरकारने ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे. यापैकी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर विमानतळ, महाराष्ट्रातील शिर्डी आणि सिंधुदुर्ग विमानतळ, केरळमधील कन्नूर विमानतळ, सिक्कीममधील पाकयोंग विमानतळ, कर्नाटकातील कलबुर्गी विमानतळ, आंध्र प्रदेशमधील ओरवाकल (कुर्नूल) विमानतळ आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर असे 8 ग्रीनफिल्ड विमानतळ विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई दळणवळणाला चालना देण्यासाठी आणि परवडणारी हवाई वाहतूक जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी ऑक्टोबर, 2016 मध्ये प्रादेशिक हवाई दळणवळण योजना (RCS) – UDAN (उडान -उडे देश का आम नागरिक) सुरू केली. या योजनेंतर्गत विमानतळांचा विस्तार/विकास ‘मागणीवर आधारित’ असून विविध सवलती पुरवण्यासाठी राज्य सरकार तसेच विमानकंपनी चालकांच्या प्रतिबद्धतेवर अवलंबून आहे.
उडानअंतर्गत बोलींच्या चार फेऱ्यांच्या आधारे, उत्तर प्रदेशसह देशभरात विविध ठिकाणी 14 जल विमानतळ आणि 36 हेलिपॅडसह 154 विमानतळ निश्चित करण्यात आले आहेत. 14.03.2022 पर्यंत, 8 हेलीपोर्ट्स आणि 2 जल विमानतळांसह 66 सेवेत नसलेल्या आणि सेवेत कमी असलेले विमानतळ कार्यान्वित केले गेले आहेत. कार्यान्वित करण्यात आलेल्या 66 विमानतळ/हेलिपोर्ट/जल विमानतळांची यादी जोडली आहे.