नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत सामान्य नागरिक बिनधास्त स्वत:च्या मनाने वापरणाऱ्या पॅरासिटामॉलसह १४ औषधांवर बंदी आणली आहे. या निर्णयाने डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषध घेण्याच्या आरोग्यासाठी धोकादायक प्रवृत्तीवर आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्र सरकारने ३ जून रोजी आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या १४ फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे. तज्ज्ञ समितीच्या अहवाल दिल्यानंतर सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. एका गोळी किंवा औषधामध्ये एकापेक्षा जास्त घटक एकत्र असल्यास, अशा औषधांना फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधे म्हणतात. या औषधांना कॉकटेल औषधे असेही म्हटले जाते. यामध्ये पॅरासिटामॉल आणि निमेसुलाइड यांसारख्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे.
ही औषधे लगेच आराम देतात पण यामुळे आरोग्याचं नुकसान होण्याचा धोका जास्त आहे. बंदीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ सल्लागार समितीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आपला अहवाल सादर केला होता. या औषधांचे कोणतेही वैद्यकीय औचित्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.
बंदी घालण्याची शिफारस करणाऱ्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार, एफडीसी औषधांच्या उपचाराबाबत कोणतेही वैद्यकीय पुरावे समोर आलेले नाहीत. तसेच ही औषधे मानवांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी, या औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. ही बंदी ९४० ड्रग्ज अॅण्ड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम २६ए अंतर्गत लागू करण्यात आली आहे.
यांचा आहे समावेश
निमेसुलाइड + पॅरासिटामॉल
क्लोरफॅनिरामाइन + कोडीन सिरप
फॉल्कोडाइन + प्रोमॅथाजीन
एमॉक्सिसिलिन + ब्रॉमहेक्सिन
ब्रॉमहेक्सिन + डॅक्सट्रोमेथॉर्फन + अमोनियम क्लोराइड मेंथॉल
पॅरासिटामोल + ब्रॉमहेक्सिन फॅनिलेफ्राइन + क्लोरफेनिरामाइन + गुइफॅनेसिन
सालबुटामॉल + क्लोरफॅनिरामाइन
Union Government 14 Medicines Banned