मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या आजारावरील उपचारासाठी केंद्र सरकार देणार १० लाखांची मदत; मुंबईतील या दोन रुग्णालयात सुविधा

by Gautam Sancheti
मे 10, 2023 | 5:28 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत थॅलेसेमिया आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णांना थेट १० लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. मुंबईतील दोन हॉस्पिटलसह देशातील एकूण १० हॉस्पिटलमध्ये ही सुविधा मिळणार आहे.

जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आरोग्य मंत्रालयाच्या थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या (टीबीएसवाय) तिसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ झाला. हा तिसरा टप्पा कोल इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत राबवला जात आहे. यावेळी डॉ. भारती पवार यांच्या हस्ते थॅलेसेमिया बाल सेवा योजना पोर्टलही सुरू करण्यात आले.

थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधीत अनुवांशिक आजार आहे. या आजारामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी होत राहते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना [National Health Mission (NHM – एनएचएम)] अंतर्गत 2017 पासून थॅलेसेमिया बाल सेवा योजना (TBSY – टीबीएसवाय) राबवली जात आहे. नुकताच मार्च 2023 मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला होता. कोल इंडियाच्या वतीने, त्यांच्या सीएसआर उपक्रमांअंतर्गतच्या वित्तीय सहकार्याच्या माध्यमातून हेमॅटोपॉएसीस स्टेम सेल ट्रान्सप्लांट (HSCT – एचएससीटी)] हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत वंचित घटकांमधील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना, ज्यांच्याकडे वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्यारोपणासाठी जुळणारे दाते आहेत, परंतु या प्रक्रियेचा खर्च भागविण्यासाठीची आर्थिक क्षमता अथवा स्रोत नाही, अशा रुग्णांना या आजारातून मुक्त होण्यासाठी एकदाच करायच्या उपचारांची संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंतच्या दोन टप्प्यांमध्ये देशभरातील 10 सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये, थॅलेसेमिया रूग्णांवरच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची (bone marrow transplants) 356 प्रकरणे यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहेत.

‘थॅलेसेमिया आणि सिकलसेल सारख्या रक्तविकारांचा सामना करण्यासाठी या आजाराशी संबंधीत तपासण्या आणि चाचण्या वाढवणे, या आजारासंबंधी अधिकाधिक जनजागृती करणे, समुपदेशनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, आणि उपचारांच्या सोयी सुविधा वाढवणे गरजेचे आहे असे, डॉ. भारती पवार यावेळी म्हणाल्या.रक्ताशी संबंधित विकारांविरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी समाजातल्या विविध भागधारकांनी पुढाकार घेत, सहकार्य आणि मदतीचा हात पुढे करायला हवा असे आवाहनही त्यांनी केले. आपण बहुभागधारक दृष्टीकोन समोर ठेवून वाटचाल केली तर त्यामुळे रक्ताशी संबंधित विकारांबात जनजागृतीसाठी तसेच,संबंधित आजरांवरच्या उपचारांसाठी देशव्यापी सहकार्य आणि मदत उभी करणे शक्य होऊ शकते असे त्या म्हणाल्या.

यावेळी डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सिकलसेल आजारावरच्या मानक उपचार पद्धतीचेही प्रकाशन करण्यात आले. ही उपचार पद्धती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) विकसित केली आहे. सिकलसेल ॲनिमियासारख्या आजारांवरच्या उपचारांसाठी केंद्र सरकारच्या वतीने, रक्त संक्रमण अर्थात ब्लड ट्रान्स्फ्युजनची गरज भागवता यावी याकरता ई-रक्तकोश पोर्टल तसेच, या आजावरच्या उपचार आणि निदान सेवेसाठी दीड लाखांहून अधिक आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे जाळे उभारण्यासारखे विविध उपक्रम राबवत असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली.

थॅलेसेमिया बाल सेवा योजनेअंतर्गतच्या या तिसऱ्या टप्प्यात प्रति रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपणासाठी [Hematopoiesis stem cell treatment – हेमॅटोपॉएसीस स्टेम सेल ट्रान्सप्लांट (HSCT – एचएससीटी)] 10 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत कोल इंडिया लिमीटेडकरून रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपण [Hematopoiesis stem cell treatment – हेमॅटोपॉएसीस स्टेम सेल ट्रान्सप्लांट (एचएससीटी)] करणाऱ्या संस्थांना थेट हस्तांतरित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांमधील थॅलेसेमियाग्रस्त रूग्ण आणि वाढ खुंटवणाऱ्या अशक्तपणाने (aplastic anemia -अल्पास्टिक अनेमियाना) ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. उपचार घेतले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरू शकत असल्याने या उपक्रमाचा मोठा लाभ अशा रुग्णांना मिळणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह भारतातील 10 नामांकित रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.

Union Government 10 Lakh Medical Aid Disease Treatment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सलग फ्लॉप चित्रपट.. अभिनयातून ब्रेक… अखेर आमिर खानने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

पुलंच्या कथा आता ऑडिओ बुक स्वरुपात… या अभिनेत्याच्या आवाजात ऐकायला मिळणार…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Next Post
0004260308

पुलंच्या कथा आता ऑडिओ बुक स्वरुपात... या अभिनेत्याच्या आवाजात ऐकायला मिळणार...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011