नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे ३२ हजार ५०० कोटी रुपयांच्या सात प्रकल्पांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. या प्रकल्पांना १०० ट्क्के निधी केंद्र सरकार पुरवणार आहे़. या बहु-मार्ग प्रस्तावामुळे कार्यान्वयन सुलभ होईल, गर्दी कमी होईल. परिणामी भारतीय रेल्वेच्या सर्वात वर्दळीच्या भागात आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास होईल.
उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या ९ राज्यांमधील ३५ जिल्ह्यांचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. यामुळे रेल्वेचे जाळे २३३९ किलोमीटरने वाढणार आहे. राज्यांतील लोकांना यामुळे ७.६ कोटी मनुष्यदिवसांचा रोजगार उपलब्ध होईल. प्रकल्पांमध्ये राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबुबनगर-ढोण यासह पुढील रेल्वेमार्गांचा समावेश आहे:
हे आहेत ७ प्रकल्प
- गोरखपूर-कॅन्ट-वाल्मिकी नगर – मार्गिकेचे दुहेरीकरण
- सोन नगर-आंदल मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प – मल्टी ट्रॅकिंग
- नेरगुंडी-बरंग आणि खुर्दा रोड-विजियानगरम – तिसरी मार्गिका
- मुदखेड-मेडचाळ आणि महबूबनगर-ढोणे – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण
- गुंटूर-बिबीनगर – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण
- चोपण-चुनार – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण
- समखियाली-गांधीधाम
मुदखेड-मेडचल-महबूबनगर-ढोणे प्रकल्पाविषयी
मुदखेड-ढोणे दुहेरीकरण प्रकल्प (417.88 किमी) अंदाजे 4,686.09 कोटी रुपये खर्चाचा असणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे सेवा सुरळीत होईल आणि गर्दी कमी करून रेल्वेच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळू शकेल. प्रस्तावित प्रकल्पामुळे विभागाची विद्यमान लाईन क्षमता वाढेल आणि वक्तशीरपणा तसेच वॅगन टर्नअराउंड वेळेत सुधारणा होईल. मुदखेड-मेडचल-महबूबनगर-ढोण विभागाचे (417.88 किमी) दुहेरीकरण केल्याने बल्हारशाह-काझीपेठ-सिकंदराबाद आणि काझीपेठ-विजयवाडा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होईल.
अन्नधान्य, खते, कोळसा, सिमेंट, राख, लोखंड आणि तयार पोलाद, क्लिंकर, कच्चे तेल, चुनखडी, खाद्यतेल इत्यादी विविध मालाच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमतावाढीच्या कामांमुळे २०० एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) क्षमतेची अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वे हे पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्याने हवामाना संबंधित उद्दिष्टे साध्य करणे आणि देशाच्या मालवाहतूक खर्चात कपात करणे या दोन्हींसाठी मदत होईल.
हे प्रकल्प पंतप्रधानांच्या नवीन भारताच्या संकल्पनेशी सुसंगत आहेत. ते या प्रदेशात अनेक कामे करु शकणारे मनुष्यबळ निर्माण करून प्रदेशातील लोकांना “आत्मनिर्भर” बनवतील आणि त्यांच्या रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधीही वाढतील. हा प्रकल्प बहु-आयामी संपर्क व्यवस्थेसाठीच्या पंतप्रधान-गती शक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याचे भाग आहेत. एकात्मिक नियोजनाद्वारे हे शक्य झाले असून यामुळे लोक, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड संपर्क व्यवस्था प्रदान केली जाईल.
Union Cabinet approves seven projects of Railways worth 32 thousand 500 crores railway projects Maharashtra Mudkhed Dhone Section Central Government approves the ‘Doubling between Mudkhed - Medchal & Mahbubnagar - Dhone Section’ on the Secunderabad -Guntakal-Bangalore route to optimise coal transit & ease seamless movement of traffic.