मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने देशात १५७ नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात सातत्याने आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जात आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पातही त्याची छाप पडली. तब्बल १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवस्था बळकट करण्याचे उद्दिष्ट्य सरकारने बाळगले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री नीर्मला सीतीरामण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी असल्याचे सांगितले. भारतीय महिलांच्या आरोग्याविषयी बोलताना त्यांनी अॅनिमिया आजाराचा नायनाट करण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय महिलांमध्ये अॅनिमिया सारखा गंभीर आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. या आजाराचा २०२७ पर्यंत नायनाट करणार असल्याचे त्या म्हणाल्या. शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये अॅनिमियाचा प्रसार होतो.
रक्ताच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने मृत्यूही होतात. या संकटावर मात करण्यासाठी विशेष योजना आखली असल्याचे सरकारने म्हटले आहे. यासारख्या अनेक आजारांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार संशोधनांना प्रोत्साहन देणार आहे. स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन सरकारी यंत्रणा काम करेल आणि त्यासाठी आर्थिक साक्षरतेला प्राधान्य दिले जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच आधुनिक प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद आहे. अनेक आजारांचे मूळ कारण पाणी असल्यामुळे प्रत्येक घराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा हे धोरण सरकारचे असणार आहे.
कोरोना लस दोनशे कोटींच्या पार
भारतात कोरोना नियंत्रण लस घेणाऱ्यांची संख्या दोनशे कोटींच्या पार गेल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. आतापर्यंत भारतातील २२० कोटी नागरिकांनी कोरोनाची लस घेतली असल्याचे त्या म्हणाल्या.
Union Budget 2023 Health Sector Finance Minister