नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेतीक्षेत्राला आधार देण्याचा विशेषत्वाने भर दिला गेला आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड स्थापनेची मोठी घोषणा करण्यात आली असून त्यातून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
शेती व शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवण्यात येतील. तरुण उद्योजकांद्वारे कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड तयार केला जाईल. त्याद्वारे कृषी स्टार्टअप्स निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. कापसावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. कापसातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजना राबवण्यात येतील.
बाजरीचे जागतिक केंद्र बनविणार
तृणधान्यांसाठी ग्लोबल हब तयार करण्यात येणार आहे. भारताला बाजरींचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याठी जागतिक स्तरावरील संशोधन संस्था स्थापन केली जाईल. रोजच्या जेवणातील पदार्थ ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न केले जातील. हॉर्टिकल्चरसाठी 2200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
20 लाख कोटी कृषी कर्जाचे लक्ष्य
अन्नधान्य साठवणुकीसाठी अन्न साठवण विकेंद्रीकरण योजना असेल. साठवण क्षमता- गोडाऊन वाढवणार आहे. यंदा कृषी कर्जाचे लक्ष्य 11.1% ने वाढून 20 लाख कोटी रुपये करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय क्षेत्राला कर्ज देण्यावर भर देण्यात येणार आहे. मत्स्यपालनासाठी 60 हजार कोटी रुपयांच्या नवीन सवलतीच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमताही वाढवणार.
10 हजार बायो सेंटर्सची घोषणा
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढच्या तीन वर्षांत सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी 10 हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना करण्यात येणार आहे.
Union Budget 2023 Farmer Agriculture Finance Minister Announcement