केंद्रीय अर्थसंकल्प २०२२: महत्त्वाच्या घोषणा आणि हायलाईटस
– क्रिप्टो करन्सीच्या (virtual digital assets) व्यवहारातून मिळवलेल्या उत्पन्नावर 30 टक्के कर
– पूर्व किनारपट्टीवर ₹ 44,605 कोटी खर्चाच्या केन-बेतवा लिंकिंग प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल
– 9 लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा, 62 लाख लोकांना पिण्याचे पाणी, 103 मेगावॉट जलविद्युत निर्मिती आणि 27मेगावॉट सौरउर्जानिर्मिती ही प्रकल्पाची उद्दिष्टे
– एमएसएमईंना अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देणारी आकस्मिक कर्ज हमी योजनेला मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ
– हमीच्या छत्रामध्ये 50,000 कोटी रुपयांवरून 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ
– 2021-22च्या रब्बी हंगामात गव्हाची आणि 2021-22च्या खरीप हंगामात धानाची अशी 1208 लाख मेट्रिक टन गहू आणि धानाची 163 लाख शेतकऱ्यांकडून खरेदी होईल असा अंदाज
– एमएसपीचे सुमारे 2.37 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतील
https://twitter.com/PIBMumbai/status/1488405285811097608?s=20&t=k1sUV_zmGzwTpLRdZuWFWQ
– पीक मूल्यमापन, जमिनीच्या नोंदीचे डिजिटायझेशन आणि कीटकनाशके आणि पोषकद्रव्ये फवारणीसाठी किसान ड्रोन च्या वापराला प्रोत्साहन देणार
– विद्यार्थ्यांसाठी PM E-Vidya योजने अंतर्गत One Channel One TV ची घोषणा
– 2022-23 चा अंदाजित खर्च : 39.45 लाख कोटी रुपये आणि अंदाजित जमा रक्कम : 22 लाख कोटी रुपये
– सरकारी टेंडरचे नियम बदलणार, संपूर्ण प्रक्रिया Digital होणार
– व्यवसाय करणऱ्या तरूणांना Drone Shakti मार्फत पाठबळ देणार
– कॉर्पोरेट टॅक्स 18 टक्क्यांवरून 15 टक्के
– पोस्ट ऑफिसमध्येही बँकेची कामं होणार
– घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार
– चिप असलेला ई-पासपोर्ट 2023 पासून लागू होणार
https://twitter.com/PIBMumbai/status/1488403609369063426?s=20&t=k1sUV_zmGzwTpLRdZuWFWQ