इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहेत. केंद्र सरकाराच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. या बजेट सत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यानी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा १९६१ ची जागा घेईल. आता नवीन करप्रणातील १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही.
या नव्या बदलात टँक्स स्लॅबशी काहीही संबध नाही. टीडीएसची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल असे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. जेष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली आहे. त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत ५० हजार रुपयांवरुन १ लाख रुपये करण्यात येत आहे. टीडीएस – टीसीएस कमी होणार आहे.
२०२० च्या अर्थसंकल्पात जेव्हा सराकारने नवीन कर प्रणाली लागू केली. तेव्हा लोक ती स्वीकारण्यास तयार नव्हते असे अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले आहे. आयकर दात्यांनी जुन्या कर प्रणाली नवीन कर प्रणालीपेक्षा चांगली आणि अधिक फायदेशीर वाटत होती. पण, आता देशातील ६५ टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे.
बदलानंतर नवीन कर व्यवस्था अशी होती
०- १३ लाख – शून्य
३ ते ७ लाख – ५ टक्के
७ ते १० लाख – १० टक्के
१० ते १२ लाख – २० टक्के
१२ ते १५ लाख – २० टक्के
१५ लाखाच्या वर -३० टक्के
जुनी कर व्यवस्था अशी
० ते २.५ लाख रुपयांपर्यंत ० टक्के
२.५ ते ५ लाख रुपये उत्पन्नावर – ५ टक्के
५ लाख ते १० लाख रुपये उत्पन्न – २० टक्के
१० लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर – ३० टक्के