मुंबई – युनियन बँक ऑफ इंडिया ने जेसीबी इंटरनॅशनल नेटवर्कवर युनियन बँक रुपे वेलनेस कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत भागीदारी केली आहे. या कार्डद्वारे जीवनशैली, फिटनेस, कायाकल्प, आरोग्य आणि ग्राहकांची वैयक्तिक काळजी यावर लक्ष केंद्रित केले आहे.
युनियन बँक रुपे वेलनेस क्रेडिट कार्डच्या सहाय्याने, वापरकर्ते ग्राहक भारतभरातील निवडक जिममध्ये 15 ते 30 दिवसांचे नामांकीत जिमचे सदस्यत्व घेऊ शकतील. तसेच या जिमच्या विद्यमान सदस्यांना या कार्डचा वापर करून सदस्यत्वाचे नूतनीकरण करताना 40 ते 50 टक्के सूट मिळेल. तसेच क्रेडिट कार्डधारकांना एका वर्षात प्रीमियम आरोग्य तपासणी पॅकेज देखील मिळेल. पॅकेज वापरल्यानंतरही ते सवलतीच्या दरात आरोग्य तपासणीसाठी जाऊ शकतात.
याव्यतिरिक्त, ग्राहक युनियन बँक रुपे वेलनेस क्रेडिट कार्डचा वापर भारतभरातील 30 हून अधिक देशांतर्गत विमानतळांवर प्रत्येक तीन महिन्यांत दोनदा विनामूल्य लाउंजमध्ये प्रवेश करण्यासाठी करू शकतात. युनियन बँक रुपे वेलनेस कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत भागीदारी केली आहे. भारतातील, ग्राहकांच्या वाढत्या आणि बदलत्या गरजा पूर्ण करणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
जेसीबी एक अग्रगण्य जागतिक पेमेंट ब्रँड आहे जेसीबीने 1961 मध्ये जपानमध्ये आपला कार्ड व्यवसाय सुरू केला आणि 1981 मध्ये जगभरात विस्तार करण्यास सुरुवात केली. जेसीबी विविध देश आणि प्रदेशांमधील 140 दशलक्ष कार्डधारकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्ड आदा करते. जेसीबीने जागतिक पातळीवर शेकडो आघाडीच्या बँका आणि वित्तीय संस्थांशी आपले व्यापारी व्याप्ती आणि कार्डमेम्बर बेस वाढवण्यासाठी करार केला आहे.