सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रायते-भाटगाव जवळील अगस्ती बंधाऱ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. हे दोघे तरुण बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यात दोघे बुडाले. दीपक दिलीप मिटके व तुषार देविदास उगले अशी दोघांची नावे आहे. तरुण बुडल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान येवला शहर पोलिसात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.