नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना 3 लाख रूपयापर्यंत विना निविदा काम देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय काम वाटप समिती नियुक्त करण्यात आली आहे. याकरीता शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी कामाचे प्रस्ताव 10 मे 2022 रोजी 05.00 पर्यंत सादर करावेत, असे सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विविध प्रकारची 3 लाख रुपयांची विना निवीदा कामे बेरोजगारांच्या नोंदणीकृत कार्यरत सेवा सोसायट्यांनमार्फत करून घेण्यासाठीचे प्रस्ताव 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 4 आस्थापनांची सफाईगार आणि मुख्य सहाय्यक स्वयंपाकी बाबतची कामे समितीकडे प्राप्त झाली आहे. तसेच या निविदेतंर्गत जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडील होणारी दैनंदिन व्यवहाराची कामे, आवश्यक सेवा, साफसफाई, स्वच्छतेची कामे तसेच विविध कंत्राटदारामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी सदरची कामे बेरोजगारांच्या नोंदणीकृत सेवा सोसायट्यांना देण्यासाठीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित प्रपत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात वेळेत सादर करावेत, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे
▪️ संस्थेचे 2020-2021 ते 2021-2022 लेख परिक्षण अहवालाच्या छायांकित प्रत
▪️संस्थेचे ऑगस्ट 2000 नंतर स्थापन झालेले नोंदणी पत्र
▪️सेवा सोसायटी सभासदाचे सेवायोजन कार्ड नुतनीकरण करून अद्यावत यादी
▪️सोसायटीस उपविधीप्रमाणे कोणते कामे नमुद आहे याबाबतची कागदपत्रे
▪️किमान 6 महिने कार्यरत असल्याबाबतची कागदपत्रे
▪️या पुर्वी सदर संस्थेने केलेल्या कामाबाबतची कागदपत्रे
▪️चालु आर्थिक वर्षात किती कामे मिळाली याचा तपशिल
▪️संस्थेचे बँक खात्याचे मागील वर्षाचे विवरणपत्र
▪️ बँक पासबुकची छायांकीत प्रत