नवी दिल्ली – दिल्लीतील एम्स हॅास्पिटलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे (६२) याचे कोरोनामुळे निधन झाले ही अफवा असून त्याचे दिल्ली पोलिसांनी खंडन केले आहे. २६ एप्रिललाच छोटा राजनला प्रीमियर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. येथेच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण, उपचार घेत असतांनाच त्याचे निधन झाल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या. त्यानंतर पोलीसांनी या वृत्ताचे खंडण केले.
सीबीआय छोटा राजनच्या विरोधातील ६८ खटल्यांचा तपास करीत आहे. त्यापैकी २५ प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आणि ४ प्रकरणांमध्ये कोर्टाने त्याला दोषी ठरविले आहे.. २०१५ मध्ये छोटा राजनचे इंडोनेशियाच्या बालीमधून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यानंतर तो तिहाड जेलमध्ये आहे. २०१८ मध्ये त्याला पत्रकार ज्योतिर्मय डे च्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलीआहे. त्याच्या विरोधात अनेक खटले असल्यामुळे हे सर्व खटले सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आले. त्यासाठी स्पेशल कोर्ट गठीत करण्यात आले आहे.