अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला – दक्षिण मध्य रेल्वे विभागातील शिर्डीला जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी महत्त्वाचे व शेवटचे स्थानक असलेले नगरसुल रेल्वे स्टेशन येथे आज रेल्वे अधिकारी विनोद आर्या, जनार्धन बालमूज औरंगाबाद. भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाअध्यक्ष डीआरयूसीसी सदस्य समीर समदडिया यांनी भेट देत पाहणी केली.
येवला-नांदगाव राज्य महामार्ग क्र.२५ वर रेल्वे गेट क्र.८ बंद करून तयार करण्यात आलेला अंडरपास बाबत दरवर्षी पावसाळ्यात अडचणी निर्माण होत असतात. यावेळेस ही या ठिकाणी असलेल्या अंडरपासमध्ये पाणी साचल्याने अनेक समस्याना नगरसुल येथे बाहेररून येणाऱ्या तसेच स्थानिक नागरिकांना येवल्याकडे जातांना पाण्यातून प्रवास करावा लागतो,स्थानिक रहिवासी सुनील पैठणकर,विनोद पाटील. सरपंच प्रसाद पाटील.दिनेश आव्हाड उद्धव निकम यांनी याबाबत केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांना अवगत करून ही समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती रेल्वे सल्लागार समिती सदस्य समीर समदडीया यांनी केली होती.
केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांनी तात्काळ त्याची दखल घेत रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी अकराच्या दरम्यान रेल्वेचे उच्च अधिकारी जनार्दन बाबलूज ,विनोदकुमार आर्या यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित समस्या तांत्रिक पद्धतीने तात्काळ निराकरण करण्याचे सूचित केले. यावेळेस भाजपाचे राजू परदेशी, भाजपा येवला तालुकाअध्यक्ष नंदू शिंदे, सुनिल पैठणकर, विनोद पाटील, दत्ताभाऊ सानप, संतोष काटे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.