इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अनेक ठिकाणी वादाच्या ठिणग्या पडतात. त्यामुळे ब-याच ठिकाणी गडबडही होते. पण, तरी महायुतीमध्ये बहुतांश ठिकाणी वाद शमला आहे. पण, त्यात काही नेते मात्र एखादे वक्तव्य करतात. त्यानंतर वाद उफाळून येतो. असाच वाद आता उल्हासनगरमध्ये सुरु आहे.
उल्हारनगरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, असे वक्तव्य जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांनी उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात केले होते.
या वक्तव्यानंतर उल्हासनगरमधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत जिल्हाध्यक्ष रामचंदानी हे माफी मागणार नाहीत. तोपर्यंत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता भाजप आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांचे काम करणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.