नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना अतिरिक्त मानवतावादी मदत पाठवण्याची विनंती केली आहे. युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री एमीन झापारोवा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असताना ही विनंती करण्यात आली आहे.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिलेले पत्र काल युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री एमीन झापरोवा यांनी परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना सुपूर्द केले. पत्रात, युक्रेनने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसह अतिरिक्त मानवतावादी पुरवठ्याची विनंती केली आहे. यावर लेखी यांनी ट्विट करून युक्रेनला मानवतावादी मदत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. युक्रेनच्या मंत्री म्हणाल्या की, कीवला भारताने रशियासोबत सुरू असलेले युद्ध सोडवण्यासाठी मदत करावी अशी इच्छा आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देताना असे सांगण्यात आले की, युक्रेनच्या मंत्र्यांनी युक्रेनमधील पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी ही भारतीय कंपन्यांसाठी एक संधी असल्याचेही सुचविले. विशेष म्हणजे युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री एमीन झापरोवा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचा नेता भारत दौऱ्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी त्यांनी एका निवेदनात भारताची स्तुती करणारे गीत वाचले होते.
युक्रेनला पाठिंबा देणे हाच खऱ्या विश्वगुरूसाठी योग्य पर्याय असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम), संजय वर्मा, परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचीही भेट घेतली. नेत्यांची भेट घेतल्यानंतर झापरोवा यांनी थिंक टँकच्या कार्यक्रमाला संबोधित केले.
यावेळी त्या म्हणाल्या की, युक्रेनला भारतासोबत घनिष्ठ आणि सखोल संबंध हवे आहेत. कोणत्याही देशाच्या प्रादेशिक अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कोणतीही आक्रमकता ही अत्यंत चिंतेची बाब आहे. भारताने अशा लोकांना ओळखले पाहिजे. दुसरीकडे पाकिस्तानबाबत त्या म्हणाल्या की, युक्रेनचे पाकिस्तानसोबतचे संबंध भारताच्या हिताच्या विरोधात नाहीत.
युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री एमीन झापरोवा यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले की, युक्रेनला भारतासोबत जवळचे आणि सखोल संबंध हवे आहेत. ICWA मध्ये त्या म्हणाली की मी येथे एक अतिशय महत्त्वाचा संदेश घेऊन आले आहे की युक्रेनला भारत आणि युक्रेनला जवळ यायचे आहे. आपल्या इतिहासात वेगवेगळी पाने आहेत. तरीही, आपण एक नवीन अध्याय सुरू करू शकतो. कीवमध्ये भारतीय नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होईल, असे त्या म्हणाल्या.
गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीपासून रशियन आक्रमण सुरू झाल्यानंतर भारताला भेट देणारे पहिले युक्रेनचे नेते झापरोवा म्हणाल्या होत्या की पंतप्रधान मोदींना युक्रेनला भेट देण्याचे आमंत्रण आधीच देण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारतीय पंतप्रधानांनाही निमंत्रित केले आहे. त्या म्हणाल्या की, आम्हाला भारतासोबतचे संबंध दृढ करायचे आहेत. आम्ही आमच्या देशात पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी जागतिक व्यासपीठावर म्हणाले की, हे युद्धाचे युग नाही. या युद्धाचा परिणाम जगभर दिसून आला आहे. विशेषत: जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे.
Ukriane President Letter to PM Narendra Modi