इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे राजधानी कीवमधून नागरिकांनी पलायन सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते बराच वेळ ठप्प झाले होते. तथापि, असे काही जण असे आहेत की, ज्यांना सध्या शहरात राहायचे आहे. असे नागरिक बँकेतून आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यासाठी लांबच लांब रांगेत थांबलेले दिसले. सकाळी आकाशात विमाने उडत असल्याने आणि स्फोटांचे आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट वाढली होती.
युक्रेनियन आणि पाश्चिमात्य राजकारण्यांनी रशियन हल्ला जवळ येत असल्याचा इशारा देऊनही, कीव शहरातील नागरिकांना त्याची फारशी चिंता नव्हती. सुपर मार्केटसमोर लांबलचक रांगेत उभी असलेली मार्केट एक्सपर्ट महिला म्हणाली, मला हे अपेक्षित नव्हते. आज सकाळपर्यंत काही होणार नाही अशी भावना होती. मी जागी होते. तसेच मी खाद्यपदार्थ विकत घेतले असून माझ्या कुटुंबासोबत घरीच राहीन. कीवमध्ये राहण्याच्या तयारीत असलेले नागरिक इतर सुपरमार्केट आणि किराणा दुकानांसमोरही खरेदीदारांची गर्दी दिसून आली.
https://twitter.com/Reuters/status/1497302881904566274?s=20&t=8uFvwEXcnnp2HLL9bUwaKA
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड अजूनही कार्यरत होते आणि एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतर काही नागरिकांनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला. हाच त्यांना सुरक्षित मार्ग वाटत होता. काही जण त्यांच्या बॅगा आणि सुटकेससह बस आणि कारमधून शहर सोडताना दिसले. तसेच एका वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे की, कीवमधील गॅस स्टेशनवर पहाटेच कारच्या लांबलचक रांगा लागल्या. शहरातील मेट्रो यंत्रणा सर्व प्रवाशांसाठी मोफत घोषित करण्यात आली होती. कॉरिडॉरमध्ये अनेक नागरिक सामानासह दिसले. त्यापैकी बहुतेकांना कुठे जायचे याची खात्री नव्हती, परंतु ते भूमिगत असल्याने त्यांना सुरक्षिततेची भावना होती.
https://twitter.com/JimJame74888138/status/1497415296549851138?s=20&t=8uFvwEXcnnp2HLL9bUwaKA
कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी शहरातील तीन दशलक्ष लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले. कीवमध्ये नागरी संरक्षणाचे सायरन वाजत होते, परंतु शहराच्या मुख्य रस्त्यावर, चेचत्यकवर चिंता आणि सामान्यतेची मिश्र प्रतिक्रिया होती. ज्या हॉटेलमध्ये अनेक असोसिएटेड प्रेस पत्रकार थांबले होते, त्यांना ३०मिनिटांच्या आत रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. स्फोटाच्या आवाजाने शहराच्या बाहेरील काही जण जागे झाले, परंतु इतरांना कोणताही आवाज ऐकू आला नाही. तसेच बरिसिपिल या उपनगरच्या महापौरांनी सांगितले की, काही स्फोट अज्ञात ड्रोनच्या गोळीबारामुळे झाले. रस्त्यावर उभे असलेले नागरिक म्हणाले, सध्या आम्हाला सध्या भीती वाटत नाही. पण काही घडल्यास नंतर भीती वाटू शकते. प्रवासी बस स्टॉपवर थांबले होते. काही जण कामावर जात होते, तर इतर जण त्यांच्या कारमध्ये शहर सोडण्याच्या घाईत होते.
https://twitter.com/theghostofkyiv_/status/1497427458005499905?s=20&t=8uFvwEXcnnp2HLL9bUwaKA