इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेनमधील बुचा येथे रशियाच्या सैनिकांनी सामान्य नागरिकांची हत्या केल्यावरून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुचा येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी रशियाने युद्धाचे सर्व नियम पायदळी तुडवले असून, सामान्य नागरिकांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, बुचामध्ये झालेल्या नरसंहारचा खरा दोषी रशियाचा सैनिक कमांडर अजात्बेक ओमुरबेकोव्ह होता असा आरोप असून, पन्नास वर्षांखालील पुरुषांची ओळख पटवून त्यांची हत्या करा आणि महिलांवर सामुहिक बलात्कार करा, असे आदेश ओमुरबेकोव्ह याने आपल्या सैनिकांना दिले होते. असा दावा ब्रिटिश मीडियाने केला आहे. रशियाचा कमांडर हा बुचाचा खाटिक (कसाई) आहे, अशी टीकाही ब्रिटिश मीडियाने केली आहे.
सेपरेट मोटराइज्ड रायफल ब्रिगेडचा कमांडर अजात्बेक ओमुरबेकोव्ह याने नागरिकांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह दफन करण्यासाठी कुटुंबीयांना फक्त वीस मिनिटांचा वेळ दिला होता, असा दावा माध्यमांनी केला आहे. अजात्बेकचा देवावर विश्वास आहे, त्यामुळे युद्ध सुरू होण्यापूर्वी त्याने ऑर्थोडॉक्स चर्चच्या पादरीकडून आशीर्वाद घेतला होता.
रशियाच्या सैनिकांच्या हल्ल्यातून वाचलेल्या बुचा येथील नागरिकांनी मृतदेहांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले, की रशियाच्या सैनिकांनी येथे पोहोचल्यानंतर नागरिकांकडून त्यांचे कागदपत्रे मागितली होती. यादरम्यान त्यांना कुठेही धोका दिसल्यानंतर त्यांनी थेट गोळी मारली. युक्रेनी लष्कराचे टॅटू शोधण्यासाठी त्यांनी नागरिकांना जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पाडले. तसेच महिलांवर सामुहिक बलात्कारही केले.

बुचामधील नरसंहाराला जबाबदार मानल्या जाणाऱ्या कमांडरचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल २०१४ रोजी रशियाचे उपसंरक्षणमंत्री दिमित्री बुल्गाकोव्ह यांनी पदक देऊन सन्मानित केले होते. सैनिकांनी केलेल्या कोणत्याही युद्धगुन्ह्याबद्दल त्यांचा कमांडर जबाबदार असतो, असे आंतरराष्ट्रीय कायदा सांगतो.