इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी युक्रेनचे अध्यक्ष तथा राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ‘जनरल मोबिलायझेशन’चे आदेश दिले आहेत. राष्ट्रपतींनी रशियाचा सामना करण्यासाठी संपूर्ण लष्करी जमवाजमव करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपतींनी हे काम लष्कराच्या जनरल स्टाफवर सोपवले आणि राष्ट्रपतींच्या मंत्रिमंडळाला त्यासाठी निधीचे वाटप करण्यास सांगितले. युक्रेन रशियापुढे गुडघे टेकणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष सुरुवातीपासून सांगत आहेत, तर रशियाने युक्रेनला तीन बाजूंनी घेरले आहे. या युद्धाची सर्व सूत्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हाती आली आहेत.
तज्ज्ञां मते, टेलिव्हिजनवर काम करणारे झेलेन्स्की आज युद्धग्रस्त देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. यावेळी त्यांचा देश आधुनिक इतिहासातील सर्वात कठीण काळ पाहत आहे. पुतिन यांनी युक्रेन आणि संपूर्ण लोकशाही जगाविरुद्ध युद्ध सुरू केले आहे, असे त्यांनी रशियाच्या हल्ल्यानंतर केलेल्या भाषणात म्हटले आहे. त्यांना आमचा देश आणि आम्ही बांधलेले सर्व काही नष्ट करायचे आहे. पण युक्रेनच्या जनतेची ताकद आम्हाला माहीत आहे. आम्हाला कोणी दाबू शकत नाही.’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रशियापुढे युक्रेन किती काळ टिकेल, किंवा झेलेन्स्की किती काळ या परिस्थितीत स्वत:ला तग धरू शकेल, हे कोणालाच माहीत नाही, पण त्यांच्या संबोधनात परिपक्वतेची झलक नक्कीच दिसून आली. युक्रेनच्या राजकीय विश्लेषक मारिया झोल्किना म्हणतात की, झेलेन्स्की यांनी युद्ध निवडले नाही आणि ते युद्धकाळातील अध्यक्षही नाहीत. पण अशा वेळी राष्ट्रपती नेमके काय करत असावेत ते ते करत आहेत.
तज्ञ वोलोडिमिर येर्मोलेन्को म्हणतात की, झेलेन्स्की हे पूर्व युक्रेनचे आहेत आणि रशियाच्या बाजूने बोलत आहेत. त्यांच्या टेलिव्हिजन चॅनेल क्वार्टल 95 ने रशियामध्ये व्यवसाय केला. अशा स्थितीत त्यांचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रशियाला स्वतःच्या हिताची धोरणे अपेक्षित होती. परंतु झेलेन्स्कीला समजले की रशियाला खरोखर सर्व काही स्वतःच्या इच्छेनुसार चालवायचे आहे. या वस्तुस्थितीमुळे ते युक्रेनचा देशभक्त बनले आहेत. देशातील तज्ज्ञांचे काही मत असो परंतु सध्या युक्रेनमधील सर्वसामान्य जनता रशियाने केलेल्या हल्ल्यात यामुळे भयभीत झालेली आहे असे दिसून येते, हे आल्यास त्वरित थांबवावे आणि शांतता नांदावी असे जनतेचे मत आहे. तसेच जगभरातील शांतताप्रेमी नागरिकांचेही असेच म्हणणे आहे.