इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युक्रेनमध्ये तिन्ही बाजूने घुसलेल्या रशियाच्या सैन्याने राजधानी किव्हच्या वेशीवर रणगाडे आणले आहेत. काही ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहेत. या युद्धात युक्रेनच्या १३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या एकामागून एक बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेन रक्तबंबाळ झाला आहे. निषेध आणि आर्थिक निर्बंध घालण्याशिवाय अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे काहीच करू शकत नसल्याने युक्रेन एकटे पडल्याचे चित्र आहे. तरीही युक्रेनचे मनोधैर्य खच्चीकरण झालेले दिसत नाहीये.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की युक्रेनमध्येच तळ ठोकून आहेत. ते स्वतः युक्रेनच्या सैन्याला आदेश देत आहेत. याला एका व्हिडिओमुळे दुजोरा मिळाला आहे. हा व्हिडिओ स्वतः जेलेंस्की यांनी जारी केला आहे. आपले सल्लागार आणि पंतप्रधान आजूबाजूला उभे राहून जेलेंस्की यांनी रस्त्यावर उभे राहून हा व्हिडिओ तयार केला आहे. ते म्हणाले, आम्ही किव्हमध्ये आहोत आणि युक्रेनचे संरक्षण करत आहोत. त्यापूर्वी एका जारी केलेल्या व्हिडिओमध्ये जेलेंस्की म्हणाले होते, की मी युक्रेनमध्येच आहे आणि माझे कुटुंबही युक्रेनमध्येच आहे. माझी मुलेसुद्धा युक्रेनमध्येच आहेत. ते गद्दार नाहीत. ते युक्रेनचे नागरिक आहेत. शत्रूच्या पहिल्या निशाण्यावर मी आणि माझे कुटुंब आहे अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. रशिया आम्हाला संपवून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करू पाहत आहे. बघा राष्ट्राध्यक्षांचा हा व्हिडिओ