इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाने युक्रेनविरुद्ध आक्रमण सुरू केले आहे. त्यामुळेच आज पहाटेपासून तेथे घनघोर युद्ध सुरू झाले आहे. जगभरात याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांमधील विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. भारतातील २०० हून अधिक विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना कीव या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या भारतीय दुतावासाने मोठा आसरा दिला आहे. या दुतावासातील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी सध्या या सर्व विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेत आहेत. बघा, हा त्याचा व्हिडिओ
Embassy of India in Ukraine accommodates more than 200 Indian students at school near the Embassy in Kyiv
(Source: Embassy of India in Kyiv, Ukraine) pic.twitter.com/5aTjObCvN7
— ANI (@ANI) February 24, 2022