लंडन – प्रिन्स हॅरीच्या नवजात मुलीचे नाव लिलिबेट ठेवण्यावरून वाद झाला आहे. त्यामुळे त्यांना बुधवारी एक अधिकृत पत्रक काढून त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. लिलिबेट हे प्रिन्सची आजी महाराणी एलिजाबेथ द्वितीयचे टोपणनाव आहे. मात्र ९५ वर्षीय महाराणीला न विचारताच प्रिन्सने मुलीचे नाव लिलिबेट ठेवले, असा दावा बंकिंगहम पॅलेसच्या सूत्रांनी केला होता.
प्रिन्सला त्यानंतर अधिकृत पत्रक काढून त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. शाही महालातील सूत्रांनी माध्यमांना चुकीची माहिती दिली, असे बोलले जात आहे. ‘माध्यमांमध्ये प्रकाशित झालेली माहिती खोटी आणि अपमानजनक आहे. याप्रकारच्या आरोपांची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घ्या’, असे प्रिन्सने माध्यमांना बजावले. प्रिन्स हॅरी आणि मेघन मॉर्केल यांच्या मुलीचा जन्म ४ जूनला झाला आणि रविवारी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.










