इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी प्रसिध्द सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह चार जणांची नियुक्ती केली आहे. संविधानाच्या कलम 80(1)(a) आणि त्याच कलम (3) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांनुसार त्यांनी या चार जणांची नियुक्ती केली आहे.
प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॅा. मीनाक्षी जैन यांना नामांकित केले आहे. पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर ही नामांकने करण्यात आली आहेत.
अॅड. उज्वल निकम यांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूक मुंबईत लढवली होती. पण, त्यांचा त्यात पराभव झाला. आता राष्ट्रपतींकडून त्यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले आहे.
