इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या युगात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र असून प्रत्येक शासकीय कामात आधार कार्ड आवश्यक असते. हे एक यूनीक आयडेंटिफिकेशन असून अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) ते जारी केले आहे, त्यामुळे वापरकर्त्यांची बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रविषयक माहिती नोंदवली जाते.
आधार कार्डधारक आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची ओळख कन्फर्म करू शकतात. यासाठी एक अॅप लाँच करण्यात आले आहे. कंपनीने याला आधार FaceRD असे नाव दिले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) हे लॉन्च केले आहे. त्यामुळे मोठी सुविधा झाली आहे.
एका सरकारी आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 1 अब्ज लोकांकडे आधार कार्ड आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८३ टक्के लोकांकडे त्यांचे खास ओळखपत्र आहे. सरकारने आधार कार्ड धारकांसाठी अनेक सेवा आणि सुविधा जाहीर केल्या आहेत, ते कुठेही बंधनकारक करण्यात आलेले नसले तरी, तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर तुम्ही सहज काही काम करू शकता आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
आधार कार्डचे अनेक फायदे आहेत, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही घरबसल्या प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकता. म्हणजेच आधार कार्ड धारकांसाठी मालमत्तेचे व्यवहार पेपरलेस, कॅशलेस आणि ह्युमन लेस झाले आहेत. तुम्हाला फक्त तुमचे बँक खाते, आधार आणि बायोमेट्रिक तपशील द्यावे लागतील. तुम्ही आधार कार्डधारक असाल तर तुम्ही ई-हॉस्पिटल सेवा घेऊ शकता. यासाठी सरकारी रुग्णालये आणि मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकता. महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
आता अँड्रॉईड युजर्स हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे अॅप आधार ऑथेंटिकेशनसाठी एखाद्या व्यक्तीचा चेहरा थेट कॅप्चर करते. फेस ऑथेंटिकेशनचा वापर अनेक आधार प्रमाणीकरण अॅप्सद्वारे केला जाऊ शकतो. ज्यात जीवन प्रमाण, रेशन वितरण (PDS), CoWin लसीकरण अॅप, शिष्यवृत्ती योजना, शेतकरी कल्याण योजनेचा समावेश आहे. UIDAI ने दि.12 जुलै रोजी याबाबत ट्वीट देखील केले होते.
या ट्विटमध्ये सांगण्यात आले होते की, UIDAI RD अॅपद्वारे आधार फेस ऑथेंटिकेशन फीचरचा वापर केला जाऊ शकतो. हे अनेक आधार प्रमाणीकरण अॅप्ससाठी वापरले जाऊ शकते. आधार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान UIDAI ने स्वतः विकसित केले आहे. Livemint च्या अहवालानुसार, या अॅपसह आधार धारकांना यापुढे लोकेटर आधार नोंदणी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही.
फिंगरप्रिंट स्कॅन देखील यावरच करता येईल. दरम्यान, हे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून आधार FaceRD डाउनलोड करावे लागेल. यानंतर अॅपवर सांगितलेल्या मार्गदर्शकाचे अनुसरण करा आणि पुढे जा वर क्लिक करा. चेहरा प्रमाणीकरणासाठी, तुमचा चेहरा प्रकाशात असावा आणि तुमचा बॅकग्राऊंड स्पष्ट असावी. परंतु, कधीकधी आपल्या आधार कार्डाच्या तपशीलांचा गैरवापर केला जात असेल, अशी शंका आली तर घरबसल्या आपण शोधू शकता.
UIDAI Aadhar Card New App Launch Face Authentification