गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार कार्ड सक्षम आहे का? UIDAI म्हणाले…

नोव्हेंबर 25, 2022 | 12:10 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
aadhar card

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार कार्ड  स्वीकारले जात आहे. सर्वसाधारणपणे रहिवासी पुराव्यासाठीही आधार कार्डला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, आता यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) महत्त्वाची माहिती दिली आहे. आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी संबंधित संस्थांनी आधारची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे UIDAIने स्पष्ट केले आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नमूद केले आहे की आधार धारकाच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करणे हे एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या आधार (आधार पत्र, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड, आणि एम-आधार) खरेपणा तपासण्यासाठी योग्य पाऊल आहे.
यामुळे अप्रामाणिक आणि असामाजिक घटक कोणत्याही संभाव्य गैरवापरात सहभागी होण्याला आळा बसतो. हे कोणताही 12-अंकी क्रमांक आधार नाही या युआयडीएआयच्या भूमिकेचे समर्थन करते. आधार दस्तावेजांची छेडछाड झाली असल्यास ऑफलाइन पडताळणीद्वारे त्याचा शोध घेता येऊ शकतो. छेडछाड हा दंडनीय गुन्हा असून आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दंडास पात्र आहे.

युआयडीएआय ने वापरापूर्वी आधार पडताळणीच्या आवश्यकतेवर भर देण्याची राज्य सरकारांना विनंती केली आहे आणि राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून जेव्हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार सादर केले जाईल – तेव्हा आधार वापरून संबंधित संस्थेद्वारे रहिवाशाचे प्रमाणीकरण/पडताळणी केली जाईल.
युआयडीएआयने संस्थाना प्रमाणीकरण/पडताळणीसाठी विनंती केली असून तसे अधिकार देणारी परिपत्रके देखील जारी केली आहेत ज्यात पडताळणीच्या आवश्यकतेवर भर आणि प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.

mAadhaar App, किंवा Aadhaar QR कोड स्कॅनर वापरून सर्व प्रकारच्या आधार (आधार पत्र , ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि m-Aadhaar) वर उपलब्ध QR कोड वापरून कोणत्याही आधारची पडताळणी केली जाऊ शकते. QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाइल फोन तसेच विंडो-आधारित ऍप्लिकेशनसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
रहिवासी स्वेच्छेने त्यांचे आधार कागद किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करून त्यांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांक वापरू शकतात. युआयडीएआयने यापूर्वीच रहिवाशांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती प्रसिद्ध केली असून रहिवासी आत्मविश्वासाने त्यांचे आधार वापरू शकतात.

UIDAI Aadhar Card Identity Address Proof

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

IND vs NZ ODI : न्यूझीलंडचा भारतावर ७ गडी राखून विजय; विल्यमसन आणि लॅथमची जोरदार फटकेबाजी

Next Post

चक्क दारुच्या बाटल्यांमध्ये परदेशातून आणले २० कोटींचे कोकेन; मुंबई विमानतळावर असे झाले उघड

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
मुंबई विमानतळाचे संग्रहित छायाचित्र

चक्क दारुच्या बाटल्यांमध्ये परदेशातून आणले २० कोटींचे कोकेन; मुंबई विमानतळावर असे झाले उघड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011