पुणे – आधार कार्ड हा आजच्या काळातील महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. केवळ यावर फोन नंबर, पत्ता अपडेट नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. पत्त्याचा पुरावा म्हणूनही आधार कार्ड वापरता येते. म्हणूनच यावरील पत्ता नेहमी अपडेट असायला हवा. पण जर आपला पत्ता नवीन असेल तर आपल्याकडे त्याचे काही प्रुफ नसते. आज आम्ही प्रूफ नसतानाही नवीन पत्ता अपडेट कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहोत. पत्ता ऑनलाइन बदलण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस
1. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर (https://uidai.gov.in/) लॉग इन करा.
2. My Aadhaar या विभागाअंतर्गत ‘Address Validation Letter’ हा पर्याय निवडा. यानंतर एक नवीन window ओपन होईल.
3. इथे १२ अंकी आधार नंबर किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी टाका. आणि व्हेरिफिकेशनसाठी Captcha code टाका आणि send OTP हे बटण दाबा.
4. तुमचा जो नंबर आधारकडे रजिस्टर केला आहे, त्यावर त्याचा OTP येईल. तो त्यात टाका.
5. हा ओटीपी टाकला की पुन्हा व्हेरिफिकेशनसाठी एक OTP येईल. तोदेखील त्यात टाका.
6. हा OTP व्हेरिफाय केल्यावर तुम्हाला मेसेजवर सर्व्हिस रीक्वेस्ट नंबर (SRN) पाठवला जाईल.
7. आता तुम्ही SRN टाकून लॉग इन करा. त्यानंतर अड्रेस प्रिव्ह्यू करून त्यात आवश्यक ते बदल करा. मग डिक्लरेशनवर टिक करून मग सबमिट करा.
8. पुन्हा एकदा पत्ता एडिट करून हे बदल सेव्ह करा.
9. नंतर पुन्हा डिक्लरेशनवर टिक करून रिक्वेस्ट सबमिट करा.
10. त्यानंतर तुम्हाला पोस्टाद्वारे एक कोड आणि अड्रेस व्हॅलीडेशन पत्र मिळेल.
11. ते मिळाल्यानंतर पुन्हा एकदा UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Proceed to update Address वर क्लिक करा.
12. आधार नंबरच्या साहाय्याने लॉग इन करा आणि update address via secret code हा पर्याय निवडा. सीक्रेट कोड टाका आणि नवीन अड्रेस बघा. त्यानंतर submit बटन दाबा.