पुणे – आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असून याचा उपयोग अनेक कामे करण्यासाठी केला जातो. परंतु काही नागरिकांचा फोटो आधार कार्डमध्ये व्यवस्थित आला नाही किंवा त्यात काही अस्पष्टता आली असेल, तर यामुळे त्यांना अनेक वेळा अत्यावश्यक कामे करण्यात अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु आत आपण कार्ड आधार कार्डवरील फोटो सहज अपडेट करू शकता. त्यासाठी एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे.
आपला फोटो अपडेट करण्यासाठी आपल्याला नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. त्यानंतरच तुमचा फोटो आधार कार्डवर अपडेट केला जाईल. या प्रक्रियेअंतर्गत तुम्ही तुमचा फोटो आधार कार्डवर अपडेट करण्यासाठी किंवा फोटो बदलण्यासाठी, प्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमचा आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा.
डाऊनलोड केल्यानंतर फॉर्म व्यवस्थित भरा आणि तो भरल्यानंतर नावनोंदणी केंद्रावर जाऊन सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर, नावनोंदणी केंद्राचे कर्मचारी त्यांच्या प्रणालीवर तुमची बायोमेट्रिक माहिती गोळा करतील. यामध्ये तुमच्या अंगठ्याचा ठसा आणि फोटो घेतला जाईल. सर्व तपशील घेतल्यानंतर, तुम्हाला सेवा शुल्क म्हणून 25 रुपये प्लस जीएसटी आकारले जाईल. त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट केले जाईल.
तुम्हाला नोंदणी केंद्रातून एक यूआरएन आणि स्लिप मिळेल. सुमारे दोन ते तीन दिवसांनी, या यूआरएनच्या मदतीने, तुमचा फोटो बदलला आहे की नाही हे आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता. त्यानंतर तुमचा नवीन फोटो तुमच्या आधार कार्डवर येईल, तो तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता.