नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या १२, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी होणारी UGC NET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यातील UGC NET परीक्षा २०२२ आता २० ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक आणि प्रवेशपत्र यासंबंधीची माहिती लवकरच UGC NET, ugcnet.nta.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
कुमार म्हणाले की, २० आणि ३० सप्टेंबर रोजी ६४ विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यांनी सांगितले की उमेदवारांना ११ सप्टेंबर रोजी परीक्षेच्या शहर तपशीलांची माहिती मिळेल. या परीक्षेचे प्रवेशपत्र १६ सप्टेंबरपासून जारी केले जाणार आहेत. उमेदवारांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. उमेदवारांनी विश्वसनीय माहितीसाठी NTA वेबसाइट https://ugcnet.nta.nic.in वर नियमितपणे भेट द्यावी किंवा कोणत्याही प्रश्नांसाठी [email protected] वर ई-मेल करा.
UGC NET जून २०२२ आणि डिसेंबर २०२१ फेज-II परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यातील UGC NET परीक्षा ९, ११ आणि १२ जुलै रोजी संपूर्ण भारतातील विविध परीक्षा केंद्रांवर ३३ विषयांसाठी घेण्यात आली. एनटीए परीक्षा १२, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी उर्वरित विषयांसाठी घेण्यात येणार होती जी आता २० सप्टेंबर नंतर घेतली जाईल.
https://twitter.com/PTI_News/status/1556630361253109760?s=20&t=obIXNFJ_JFtTTETeNVoUsQ
UGC NET August Exam Postponed