विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. देशभरातील विद्यापीठांची सर्वोच्च संस्था असलेल्या युजीसीने अजब फतवा सर्व विद्यापीठांना पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, देशभरात युवकांना लस मोफत दिली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे पोस्टर सर्वत्र लावण्यात यावेत. २१ जूनपासून देशभरातील १८ वर्षे वयापुढील नागरिकांना मोफत लस दिली जात आहे. युजीसीचे फर्मान येताच विविध विद्यापीठांनी पोस्टरबाजी सुरू केली आहे. काही विद्यापीठांनी त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफ़र्मवर पोस्टर झळकविले आहेत. युजीसीच्या या निर्देशावरुन मोठा वाद सुरू झाला आहे. आजवर लसीकरणावरुन केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रचंड मनस्ताप व त्रास सहन करावा लागला आहे. खासकरुन युवकांना लस मिळण्यात अनेक अडची आल्या आहेत. आणि आता पंतप्रधानांचे कौतुक करणारे पोस्टर लावण्याचे सांगून युजीसी सर्व शैक्षणिक संस्थांना नेमका काय संदेश देऊ पाहत आहेत, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. तसेच, हा वाद देशात चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.
https://twitter.com/INCIndia/status/1407677319397904399