मुंबई – कोरोना काळात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या राज्यातील ५१ उद्योजकांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यात नाशिकचे उद्योजक विवेक कुलकर्णी, मिलिंद देशपांडे, सारंग अत्तारदे, निखिल तपाडिया, विनायक गोखले, विजय लगड या उद्योजकांचा समावेश होता. यावेळी या उद्योजकांनी राज्यपालांना रामाच्या पादुका व स्मृतिचिन्ह भेट दिले
मुंबई तरुण भारत तर्फे ‘कोविड योद्धा उद्योजक सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई तरुण भारतचे मुख्य संपादक किरण शेलार व व्यापार पणन प्रमुख रविराज बावडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व ठिकाणाहून उद्योजक उपस्थित होते. यावेळी राज्यपाल म्हणाले की, गेले दीड वर्ष सुरू असलेले कोरोना संकट हे भारत मातेच्या सुपुत्रांकरतां मोठीच परीक्षा होती की जी आजही सुरूच आहे. देश संकटात असताना अनेक उद्योजकांनी नेटाने अर्थचक्र सुरु ठेवले. अनेक उद्योगांनी कामगार कपात तसेच वेतन कपात न करता सर्व प्रकारचे सरकारी कर भरण्यात दिरंगाई न करता, बॅंकेच्या मदतीने काम सुरूच ठेवले. कोरोना सारखी संकटे देशावर अधून मधून येत असतात. मात्र सर्वांनी अंतःकरणपूर्वक एकदिलाने काम केले तर देशाला कुठल्याही संकटावर मात करता येईल