नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्योगविश्व या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात तीन आंतरराष्ट्रीय व्याख्यात्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. कॉलेजरोड,गंगापूररोड वाणी मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी आयोजित केला जातो. त्याचा स्पर्धा परिक्षार्थ्यांसह अनेाकांना मोठा लाभ होतो.
स्पर्धात्मक युगात समाजातील उद्योजकांच्या होत असलेल्या प्रगतीला गती मिळावी, स्पर्धात्मक युगातील व्यापार, व्यवहारातील बदल, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, ध्येय,उद्दीष्टे, आत्मविश्वासासह आरोग्य, कृषी,अन्न प्रक्रियांमधील संधी तसेच लघु व मध्यम उद्योगातील संधी या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याख्यात्यांचे मार्गदर्शन कॉलेजरोड, गंगापूररोड वाणी मित्र मंडळाच्या वतीने बुधवार दि.२६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ४ वाजता ‘उद्योगविश्व २०२२’ या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन आयोजित करण्यात आल्याची माहीती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन दहीवेलकर, अध्यक्ष योगेश राणे, विश्वस्त योगेश मालपुरे, संजय दुसे, संजय बागड, महेश पितृभक्त, राजेंद्र कोठावदे, निलेश मकर, हितेश देव, भगवंत येवला, ऍड. देवदत्त जायखेडकर यांनी दिली.
कॉलेजरोड, गंगापूररोड वाणी मित्र मंडळाच्या वतीने ऑनलाईन बुधवार दि. २६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ४ वाजता ‘उद्योगविश्व 2022’ कार्यक्रमात सी.व्ही.चितळे ऍण्ड कंपनी पुण्याचे चार्टर्ड अकाऊटंट व डाटरेक्ट टॅक्सेस कमिटीचे चेअरमन चंद्रशेखर चितळे, ए.बी.बी.कंपनी नाशिकचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे, मुंबई येथील बिझनेस कोच आनंद मेहता या नामवंतांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात श्रोत्यांना व्याख्यात्यांना आपली प्रश्नही विचारता येणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नवयुवकांनी व उद्योजकांनी घेण्याचे आवाहन संचालक प्रविण अमृतकर, पवन बागड, हर्षद चिंचोरे, अमोल शेंडे, अविनाश कोठावदे, सुधीर नावरकर, प्रशांत मोराणकर, चेतन येवला, राकेश ब्राह्मणकर यांनी केले आहे.