मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत आक्रमक भाषेत भाषण केले. यावेळी त्यांनी हिंदुत्वापासून विविध मुद्द्यांवर तोफ डागली. केंद्र सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतानाच राज्यातील भाजप नेत्यांनाही चांगलेच खडे बोल सुनावले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे…
– मराठी माणसाची एकजूट बांधा
– हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढले आहेत ते इंग्रजांची नीती अवलंबू शकतात…
– तोडा, फोडा आणि राज्य करा असे अनेकांचं तत्व आहे
– मराठी रंगभूमी दालन करणारच. ते सुद्धा ऐतिहासिक असेल
– मुंबईत लष्कराचं संग्रहालय साकार होतंय. ते भव्य, दिव्य असेल
– धारावीचं पुनर्वसन करणारच. कुणी, कितीही अडथळे आणो. शब्द पाळणारच.
– धारावीत जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र करत आहोत
– कोरोनाच्या काळात देखील राज्यात उद्योगधंदे आणून महाराष्ट्र पुढे जातोय
– सत्ता पाहिजे तर देऊन टाकतो, फक्त माझ्यासारखं काम करून दाखवा
– आपल्या देशात युवाशक्ती मोठी आहे
– महाराष्ट्रात गांजा, चरसचं वृंदावन असल्याचं चित्र तयार केलं जातंय. हे षडयंत्र आहे
– केंद्र,राज्य अधिकारावर चर्चा करा. ते का नाही करत
– देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे मग अमृत मंथन करा
– महिला अत्याचारावर चर्चा करण्यासाठी मोदीजींनी अधिवेशन घ्यावं
– रक्तदानाचे विक्रमी शिबीर एकातरी पक्षाने करून दाखवावे
– सत्तेचं व्यसन हा ही अमली पदार्थच आहे
– ९२ साली शिवसैनिक उतरले नसते तर आज तुम्ही कुठे असता?
– हिम्मत असेल तर पाडून दाखवा..
– आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व
– काही लोक भाजपचे ब्रँड अँम्बेसिडर
– आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही
– आपला आवाज दाबणारा अजून जन्माला यायचा आहे
ठाकरे यांच्या भाषणाचा पूर्ण व्हिडिओ
https://twitter.com/ShivSena/status/1448994461644509184