मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत बंडाचा झेंडा उगारुन काही आमदारांसह गायब झालेल्या एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला विधानसभेे केवळ १८ आमदारच उपस्थित होते. म्हणजेच, ५५ पैकी केवळ १८ आमदारच वर्षावर उपस्थित होते. त्यामुळे अन्य सर्व आमदार हे शिंदेंसोबत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षाचे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी उद्धव यांनी आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेता पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, या पदावर सेना आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1539175322246995968?s=20&t=4bd87l5gB1ccSRTz1ZHT9w
uddhav thakre big decision eknath shinde removed from this post