इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर मधील निवासस्थानी उध्दव ठाकरे आज भेटीला गेले. त्यानंतर त्यांच्यात अडीच तास चर्चा झाली. या बैठकीत महानगरापालिकेच्या निवडणुकी संदर्भात ही भेट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठीकतील चर्चेत खासदार संजय राऊत व आमदार अनिल परब तर मनसेकडून माजी आमदार बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे हे सुध्दा उपस्थितीत होते.
आज दुपारी उध्दव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले. त्यानंतर त्यांच्यात बैठक झाली. आजच्या बैठकीनंतर मनसे व ठाकरे गट एकत्र येण्याच्या शक्यतांना अधिक बळ मिळाले आहे. या बैठकीत नेमकं काय झालं हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. २ ऑक्टोंबर रोजी दसरा मेळावा आहे. या दसरा मेळाव्यात राज ठाकरे देखील उपस्थित राहतील काय संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन दिवासांपूर्वी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते उध्दव ठाकरे यांच्या घरी भेटीला गेले होते. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. त्यात मनसेचाचा विषया सुध्दा चर्चेत होता. त्यामुळे आजच्या बैठकीत यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर एकत्र आले. त्यानंतर हे दोन्ही बंधू उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले. त्यानंतर गणपती दर्शनासााठी तिसरी भेट झाली. आता ही चौथी भेट आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच आजची बैठक ठरली होती. ही भेट कौटुंबिक नसून यात राजकीय चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उध्दव ठाकरे कुंदा मावाशींना भेटायला गेले होते
दरम्यान या भेटीबाबत खा. संजय राऊत यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामागे कोणतंही राजकीय कार्यक्रम नव्हता. गणपतीच्या वेळी उध्दव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी असलेल्या गर्दीमुळे राज ठाकरेंच्या आईंनी कुंदा मावशींना उध्दव ठाकरेसोबत जास्त बोलता आलं नाही. त्यामुळे नंतर पुन्हा घरी ये असं त्यांनी उध्दव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यानुसार उध्दव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी कुंदा मावशींना भेटायला गेले होते.