मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाकडे दिले आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना जबर झटका आहे. ठाकरे घराण्याकडून शिवसेना हे नाव आणि चिन्ह गेले आहे. यासंदर्भात विविध नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. उद्धव ठाकरे हे सध्या यासंदर्भात बोलत आहेत. बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
– देशात लोकशाही संपली आहे
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन तसे सांगावे की, लोकशाही संपली आहे
– निवडणूक आयोगाच्या निर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार
– राज्यात पोटनिवडणूक सुरू आहे. आचारसंहिता लागू आहे. असे असताना निवडणूक आयोग निर्णय कसे काय देऊ शकते
– निवडणूक आयोगाचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे.
– स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ७५ वर्षाचं स्वातंत्र्य संपलेलं आहे असे जाहीर करावे.
– लोकशाहीला आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याचं मोदींनी जाहीर करावे.
– न्यायव्यवस्था दबावाखाली कशी येईल, याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत.
– आजचा हा निर्णय अत्यंत अनेपेक्षित आहे, कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयत सुरु आहे. त्याची आता सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल लागेल तोपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये… पण तो निकाल दिला गेला
– लाखो शपथपत्र देऊनही हा निकाल दुर्देवी आहे
– आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नाही
Uddhav Thackeray Press Conference after Election Commission Decision