मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर सभा रविवारी होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून शहराच्या मुस्लिमबहुल पूर्व भागात उर्दू भाषेत ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहे,
उद्धव बाळासाहेब ठाकरे आने वाले हे …अली बाबा और ४० चोरोको सबक सिकाने आने वाले हे… हम तमाम मुस्लिम लोग उनका इस्तकबाल (स्वागत) करत असल्याचा प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर ‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’, अशा आशयाचेही होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
ठाकरे यांची साथ सोडून पालकमंत्री दादा भुसे हे शिंदे गटात गेल्यानंतर मालेगावमध्ये ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन या निमित्ताने केले जाणार आहे. या सभेसाठी गेले काही दिवस शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी बैठका घेऊन नियोजन केले आहे. मालेगावमध्ये भाजप सोडून अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी सुध्दा ही सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
चला मालेगाव !! pic.twitter.com/dP06XGJdpD
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 25, 2023