मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी दाखल होणार आहेत.
थोड्याच वेळात होणाऱ्या या बैठकीमध्ये विविध बाबींवर चर्चा केली जाणार आहे. सर्वप्रथम आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. त्यासाठीची रणनिती आखली जाणार आहे. न्यायालयाकडून या निर्णयाला स्थगिती मागितली जाणार आहे. तसेच, पक्षाचे नवे नाव आणि चिन्ह काय असावे, यासंदर्भातही सखोल चर्चा केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या आठवड्यात अंतिम सुनावणी होण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीनेही सर्व पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकीलांना आणखी चांगले मुद्दे कागदपत्रे व रसद कशी पोहचवता येईल याबाबतही अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
तसेच, यापुढील काळात आपली संपूर्ण रणनिती काय असावी, याचाही निर्णय घेतला जाणार आहे.
शिवसैनिकांनो, शिवसेनाप्रेमींनो खचू नका, या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.अंतिम विजय आपलाच आहे. तोपर्यंत आपल्याला लढावे लागेल !
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) February 17, 2023
Uddhav Thackeray Emergency Meeting at Matoshri Shivsena Politics