इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वंचित बहुजन आघाडीचे नेते सिध्दार्थ मोकळे यांनी एक खळबळजनक दावा केल्यामुळे त्याची राजकीय वर्तूळात मोठी चर्चा आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे २५ जुलै रोजी नवी दिल्लीत जे.पी. नड्डा यांना भेटले. २५ जुलै रोजी रात्री २ वाजता ७, डी. मोतीलाल मार्गावर ही भेट झाली. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: गाडी चालवत एकटेच उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहचले. रात्री १२ वाजात मातोश्रीवर गेल्यावर या दोन्ही नेत्यांची दोन तास चर्चा झाली. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी उध्दव ठाकरे दिल्ली जाऊन पोहचले. दिल्लीला जाताना त्यांच्या सोबत कोण कोण होते? दिल्लीत त्यांनी कोणकोणाच्या भेटी घेतल्या त्या भेटीत काय ठरले? हे जनतेला सांगाव अशी मागणी त्यांनी केली.
हा गौप्यस्फोट का केला यामागील कारणही सिध्दार्थ मोकळे यांनी सांगितले. राज्यातील आरक्षवादी मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचे माहित आहे. परंतु, या आरक्षण समर्थक लोकांनी उध्दव ठाकरे यांना मतदान केले आहे. राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहे. यामुळे राज्यातील आरक्षवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती समोर आणल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान या गौप्यस्फोटबाबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिध्दार्थ मोकळे यांच्याकडे काही माहिती असेल ती माहिती त्यांनी जनतेसमोर आणली आहे. मागील निवडणुकीत संविधान आणि आरणवादी मतदारांची फसवणूक झाली आहे. ती फसवणूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी ही माहिती सांगितल्याचे ते म्हणाले.