इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे आता राजकीय हालचालीला जोरात सुरु झाल्या आहे. महाविकास आघाडीमध्ये आता तिन्ही पक्षांच्या आघाडीबाबात एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. त्यात उद्धव ठाकरे ठाकरें यांच्या नेतृत्वात राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? हे निवडणुकीनंतर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील काँग्रेस नेत्यांना ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असणार आहेत. प्रचार प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात राज्यात विधानसभेचा संपूर्ण प्रचार होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्यात आले होतं. त्यामुळे ही जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार असल्याबाबत निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे.