मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याची माहित शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठाणे येथील शिवसैनिकांशी संवाद साधतांना दिली. एकीकडे संजय राऊत यांच्यावर ईडीची धाड पडलेली असतांना दुसरीकडे ठाणे येथील शिवसैनिक हे मातोश्रीवर गेले. या ठिकाणी त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
गेले आठ तासापासून ईडीची चौकशी सुरु आहे. त्यानंतर उध्दव ठाकरे यांची ही पहिली प्रतिक्रिया आली आहे. यावेळी ठाकरे म्हणाले की, आज त्यांनी रोखठोख लिहिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पण हे सर्व कारस्थान निर्लज्जपणाचा कळस सुरु आहे. लाज, लज्जा, शरम सोडून हे कारस्थान सुरु असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
ठाणे येथून खासदार राजन विचारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नेत्वृत्वाखाली हे शिवसैनिक आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. या भेटीत जयनाथ पूर्णेकर यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसोबत शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. शिवसेनेमध्ये मोठी फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ठाणे येथे शिवसेनेला मोठा धक्का होता. त्यामुळे ठाणे येथे शिवसेना कमकुवत झालेली असतांना आज खा. राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली हे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळेस ही प्रतिक्रिया दिली.