मुंबई – महाराष्ट्रातून उद्योगाचे प्रकल्प गुजरातला गेल्याने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा असल्याची टीका केली. त्यानंतर ठाकरे यांच्या आरोपाला उद्योगमंत्री उद्य सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्त्युतर दिले. यावेळी त्यांनी मविआ सरकारकडून पाठपुरावा केला नसल्याचा आरोप केला नाही. आदित्य ठाकरेंना सरकार गेल्याचा राग असल्याचे सांगून सर्व आरोपाला उत्तर दिले.
आदित्य ठाकरे यांनी राजीमाना मागण्यापर्यंतचे राजकीय आरोप मी समजू शकतो. पण आदित्य ठाकरे फक्त बोलत आहेत, त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांनी कागदपत्र द्यावीत, असे उदय सामंत म्हणाले. यावेळी त्यांनी एअरबस प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये आणण्यासाठी त्यावेळी महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न झाल्याची कागदपत्रे नाहीत. त्यावेळी विरोधी पक्ष नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नागपूरला आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेत सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले.