नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालया अंतर्गत केमेक्सिल या निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या प्रशासन मंडळावर नाशिकच्या डॉ. उदय खरोटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. सदर निवड वर वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीसाठी असेल.
सौदर्य प्रसाधन, साबण,सुगंधी तेल आदी उत्पादनांच्या निर्यात वृद्धि साठी लघु उद्योगाना उपाययोजना करणे व त्यांच्या निर्यातित येणाऱ्या समस्याचे निराकरण करणे कामी केमेक्सिल ची सदर समिती काम करते, केमेक्सिलचे अखिल भारतीय कार्यालय मुंबईत असून अहमदाबाद, बंगलोर, कलकत्ता, नवी दिल्ली असे चार विभागीय कार्यालय निर्यात वृद्धि साथी कार्यरत आहेत.
निमाचे माजी सरचिटणीस व निप चे माजी अध्यक्ष डॉ.उदय खरोटे नाशिक येथील इंस्टो कॉस्मेटिक्स प्रा.ली.चे संचालक आहेत.