इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली. दोन ते तीन मिनिटे या दोघांमध्ये संवाद साधला. शिवेसना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काल व आज आंदोलनस्थळी भेट दिली. आज त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी जरांगे पाटील यांचे फोनवरुन बोलणे करुन दिले.
या भेटीनंतर अंबादास दानवे म्हणाले की, या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे मला माहित नाही. ते मनोज जरांगे पाटील सांगू शकतील. मी आझाद मैदानावर असताना मला उध्दव ठाकरे यांचा फोन आला. त्यामुळे मी दोघांचे बोलणे करुन दिले.
या दोन नेत्यांमध्ये काय बोलणे झाले हे समोर आले नसले तरी उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातून आलेल्या मराठा बांधवांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. सरकार मराठा बांधवांना सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे शिवसैनिकांना हे आवाहन करण्यात आले आहे.