मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात दुसरा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात ३० आमदारांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या सर्व घडामोडींवर आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.