नांदगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील शिवसेना ठाकरे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी काही महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईचे तीव्र पडसाद आता विधानसभेच्या निवडणुकीत उमटू लागले आहे. गुप्ता यांच्यावर नांदगांव पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ते गेल्या काही महिन्यापासून तुरुंगात आहे. पण, आता त्यांचे अख्खे कुटुंब व शिवसेना ठाकरे गट त्यांच्या गैरहजेरीत नांदगाव मतदार संघात जोरदार प्रचार करत असून त्यामुळे त्यांना प्रचंड सहानुभूती मिळत आहे.
नेहमीच निवडणुकीत सक्रीय असलेले गुप्ता यांची या निवडणुकीत उणीव भासत असली तरी शिवसेनेचे नेते संतोष बळीद यांनी नांदगाव शहरात मुक्काम ठोकत घरोघरी भेटी गाठी घेऊन प्रचार सुरु केला आहे. गुप्ता यांच्याबद्दल जनमाणसात सहानुभूती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक हे या निवडणुकीत उमेदवार असून त्यांच्या होणा-या प्रत्येक सभेत संतोष गुप्ता यांचे नाव आर्वाजून घेतले जाते. त्यांचे बंधु गुडड्भाऊ गुप्ता यांनी निवडणुकीत सक्रिय भाग घेतला आहे.
गुप्ता कुटुंबीय व नांदगांव व्यापारी पेठेत गुप्ता कुटुंबाचा चांगल्या कामात सहभाग असतो. गेल्या ४० वर्षात गुप्ता शिवसेनेला तीनवेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यात संतोष गुप्ता यांचा वाटा मोठा होता. आज संतोष गुप्ता हे शिवसेना ठाकरे गटाचे नांदगांव तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी आज पर्यंत जनतेच्या न्याय हक्कासाठी हजारो आंदोलने केली. अशा या सर्व समावेशक कार्यकत्यावर अमंलीपदार्थ बसल्या प्रकरी खोट्या गुन्ह्यात आडकवल्याचे आरोप झाले. त्यांच्या या घटनेची जनतेने दखल घेऊन त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे यासाठी सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. या घटनेचे विधानसभेत देखील पडसाद उमटले. पण, आता विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले आहे. मतदार दहशतीला भीक घालत नाही, ती समोर बोलत नसली तरी मतपेटीतून ती आपला संताप व्यक्त करेल असे संतोष बळीद यांनी सांगितले.