इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश योजनेत काही बदल केले आहे. या योजनेच्या अमंलबजावणीची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरु होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील ४५ लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. दरम्यान या बदलानंतर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मलई खाल्लीय असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सुध्दा केली आहे.
याअगोदर एक राज्य एक गणवेश योजनेची जबाबदारी महिला बचत गटांकडे होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. नियमित गणवेशाचा पुरवठा व्हावा म्हणून थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहे.
या योजनेतील गणवेश वाटपात होणार विलंब, गणवेशाचा दर्जा, मोजमाप यामध्ये ताळमेळ नसून योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे ही योजना वादात सापडली होती. अखेर या योजनेत काही बदल केले आहेत. त्यात आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे.