गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोदी, शाह यांच्या बॅगा तपासा ठाकरे यांची टीका

by India Darpan
नोव्हेंबर 12, 2024 | 7:59 pm
in संमिश्र वार्ता
0
udhava

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धाराशिवः देवाभाऊ-दाढीभाऊ-जाकेटभाऊ हे तिघे मिळून ‘महाराष्ट्र खाऊ’ करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रातून निघताना मोदी आणि शाह यांच्यादेखील बॅगा तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील औसा येथे ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह मोदी-शाह यांच्यावर टीका केली. शाह गृहमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यास योग्य नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. मोदी यांच्या थापांमुळे महाराष्ट्र त्रस्त आहे. त्याच प्रमाणे माझी बॅग तपासण्यात अर्थ नाही; पण मोदी आणि शाह यांच्या बॅगा तपासल्या पाहिजेत. महाराष्ट्रातून निघताना मोदी आणि शाह यांच्या बॅगा तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून निघाले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. आज मला सोलापूरला जायचे होते; मात्र हेलिकॉप्टरने येण्यापासून रोखले असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य नाहीत. त्यांनी १५ लाख देण्याचे सांगितले; मात्र १५०० रुपयेच देत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. मंत्रालयात एक महत्वाची बैठक झाल्याची माहिती माझ्याकडे आली आहे. या बैठकीनंतर राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी कसा सुखी झाला आहे, याची जाहिरात काही वर्तमानपत्रात येऊ शकते; मात्र राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी हा राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर चिडलेला आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असल्याचा दावा ते करत असले, तरीदेखील शेतकऱ्यांकडे अजूनही त्यांचा माल पडून असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. काही दिवसात पेपरमध्ये तशा बातम्या देखील छापून येतील; मात्र या बातम्या छापून आल्यानंतर शेतकरीच बोलतील, अशा शब्दात मोदी यांच्यावर टीका केली.

ठाकरे यांच्या दोन दिवस बॅगा तपासणीच्या आणि त्यांचे विमान रोखण्याच्या टीकेवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. मोदी, शाह यांच्याही बॅगा तपासल्या जातात, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज ठाकरे यांच्या टीककडे दुर्लक्ष करणार, शरद पवार यांची भूमिका; अनुल्लेखाने मारण्याची पुणेरी नीती

Next Post

महाराष्ट्रातील जनतेची राहुल गांधींकडून माफी…हे आहे कारण

Next Post
Rahul Gandhi

महाराष्ट्रातील जनतेची राहुल गांधींकडून माफी...हे आहे कारण

ताज्या बातम्या

sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011