इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022चा हंगाम सुरू होताच अनेकांची नजर दोन तरुणींवर जात आहे. सुंदर असलेल्या या तरुणी खरं तर आयपीएल संघाच्या मालक आहेत. स्टेडिअममध्ये प्रत्येक सामन्यात उपस्थित राहून या तरुणी आपल्या संघाला प्रोत्साहन देण्याबरोबरच मार्गदर्शन करीत असतात. त्या कोण आहेत ते आपण आता जाणून घेऊया…
जान्हवी मेहता
जान्हवी मेहता ही दुसरी, तिसरी कुणी नसून ती आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाची कन्या. आयपीएल लिलावावेळी जान्हवी ही अभिनेता शाहरुख खानची दोन्ही मुले आर्यन आणि सुहाना यांच्यासोबत दिसली होती. जान्हवी ही लाइमलाइटपासून दूर राहते. जुही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री खूप घट्ट आहे. त्याचवेळी त्यांच्या मुलांमध्येही चांगले नाते निर्माण झाले आहे. जुही चावलाने काही महिन्यांपूर्वी एक फोटो सोशल मिडियात शेअर केला होता. त्यात सुहाना खान, आर्यन खान आणि जान्हवी मेहता बसलेले दिसत होते.
जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन आहे. दोघेही प्रसिद्धीच्या कॅमेऱ्यांपासून दूर राहतात. मात्र, आता हळुहळू त्यांचे सार्वजनिक स्वरूप दिसू लागले आहे. गेल्या वर्षीही आयपीएल लिलावा दरम्यान जान्हवी मेहताचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. जान्हवी मेहताने परदेशातून शिक्षण घेतले आहे. तिने 2019 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. जुही चावलाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या मुलीच्या लंडनमधील पदवीदान समारंभाचा फोटो शेअर केला होता. मात्र तिच्या आईप्रमाणे जान्हवीला चित्रपटांमध्ये काम करण्यात रस नाही. तिला पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे आणि तिला लेखक व्हायचे आहे.
काव्या मारन
फ्रँचाइजी टीम सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) च्या छावणी दिसणारी तरुणी आहे काव्या मारन. मैदानात किंवा पॅव्हेलियनमध्ये ती संघाच्या खेळाडूंबरोबर दिसते. त्यामुळे तिच्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले जाते. आयपीएल लिलाव दरम्यानही काव्या बर्याचदा टीव्ही स्क्रीनवर दिसली होती. त्यामुळे तिची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिथी मारन यांची काव्या ही मुलगी आहे. एखाद्या अभिनेत्री प्रमाणे सुंदर असलेल्या काव्याची छायाचित्रेही सोशल मिडियात हजारो लाईक्स मिळवतात. आयपीएल हंगामात ती सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येते. संघाला ती चिअरअप करत असते.