नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुत्र्यावरुन दोन महिलांमध्ये कडाक्याचे भांडण झाले असून त्यांच्यात तुफान हाणामारीही झाली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेटर नोएडाच्या एका हाऊसिंग सोसायटीमधील हे प्रकरणा आहे. कुत्र्याला लिफ्टमध्ये नेण्यासाठी दोन महिला आपापसात वाद घालू लागल्या. त्याचा व्हिडिओ दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये जाण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला. लिफ्टमधील महिलेने कुत्रा आणि कुत्र्याच्या मालकिणीला लिफ्टमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. याशिवाय लिफ्ट थांबवूनही महिला बराच वेळ उभी राहिली.
त्या महिलेने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये ती महिला तुझा कुत्रा घाणेरडा आणि पट्टा नसलेला आहे असे म्हणताना ऐकू येते. ती महिला दुसऱ्या महिलेला ओळखत नसल्याचे सांगत आहे. ती कोणत्या नंबरच्या फ्लॅटमध्ये राहते हे तिला माहीत नाही. सदर लिफ्टच्या बाहेर एक महिला फोन घेऊन हजर आहे, विशेष म्हणजे लिफ्ट थांबवून उभी आहे. तिच्या मागे एक कुत्रा बसलेला दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला आणि कुत्र्याशिवाय एक गार्डही उभा असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लिफ्टमध्ये कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत असताना हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/NCMIndiaa/status/1567902256309354498?s=20&t=DBrJpfYkFdKE75GB-5g_Nw
Two Women’s Fight Dog Video Viral
Delhi NCR Crime FIR Booked